Saturday, March 27, 2010

चोर सोडून संन्यासाला फाशी

आज दिनांक २७ मार्च २००९ रोजी साध्वी श्री प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी कोर्टात येताना पत्रकारांपुढे जे बोलल्या ते आज सगळ्या वर्तमान पत्रांमध्ये छापून आलेलं आहे. साध्वी श्री प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितलाय कि जर का पोलीस चौकशीत त्यांचे काही बरे वाईट झाले तर, त्यांचा खून झाला असे समजावे.

साध्वी श्री प्रज्ञा सिंग ठाकूर या मालेगाव मध्ये सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील १ आरोपी आहेत. या खटल्यामध्ये लेफ्टनन्ट कर्नल प्रसाद पुरोहित हे देखील आरोपी आहेत. साध्वी श्री प्रज्ञा सिंग ठाकूर यांना २३ ऑक्टोबर २००८ रोजी अटक झालेली आहे. तेव्हापासून त्यांची नार्को अनालिसिस टेस्ट पर्यंत सगळ्या चाचण्या झालेल्या आहेत. तरी आतापर्यंत ATS ला त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा मिळालेला नाही. या उलट कर्नल पुरोहित यांच्यावर लावलेला मोक्का कायदा न्यायालयाने रद्द केलेला आहे. तत्कालीन ATS प्रमुख हे तर या दोघांवर समझौता एक्स्प्रेस मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल पण दोषी ठरवून मोकळे झाले होते. आणि समझौता प्रकरणामध्ये परकीय आतंकवाद्यांचा सहभागाचे पुरावे आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर केले होते. त्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बरीच नाचक्की झाली. जर का समझौता स्फोटाबद्दल आपल्याकडे आधीच ठोस पुरावे होते तर ATS प्रमुखाने असे विधान का केले होते याची चौकशी होणे हे अत्यंत गरजेचे आहे. काही राष्ट्रवादी संघटनेतील लोकांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून त्या संघटनेची बदनामी करण्याचे कारस्थान असण्याची दाट शंका आहे.

सप्टेंबर २००८, मध्ये स्फोटानंतर ज्या लोकांना अटक झाली होती त्या लोकांचा पुढे काय झाला ? माननीय कोर्टाने मोक्का कायदा हटवला, पण पोलिसांनी हे कलम लावताना याचा विचार का नव्हता केला ? मोक्का कलम लावण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त गुन्ह्यांमध्ये गोवण्यात आले कि जास्तीत जास्त गुन्ह्यात गोवले म्हणून त्यांना मोक्का लावला ? एखाद्या आरोपीची नार्को टेस्ट किती वेळा करता येते ? पोलीस कोठडीमध्ये साध्वी श्री प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावर झालेल्या अत्याचारांची दखल मानवाधिकार संघटन घेणार का कि ते फक्त दहशतवाद्यांचेच मानवाधिकार जोपासणार ? आणि देव न करो पण साध्वी श्री प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या जीवाचे उद्या काही बरे वाईट झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? बाकीचे खटले एवढ्या लवकर निकाली काढणारी ATS याच खटल्यात एवढा वेळ का लावत आहे ? त्यांना काही पुरावे मिळत नाहीत कि असे काही पुरावे नाहीतच ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला कोणीही तयार नाही. त्यामुळे हे एक षडयंत्र असावे याची शंका यायला जागा आहे.

एकीकडे अजून गुन्हेगार न ठरलेल्या आरोपीला जास्तीत जास्त कडक शासन पोलीस आणि सरकारी यंत्रणा करत असताना दुसरीकडे देशद्रोहाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेल्या अफझल ची फाशी मात्र अमलात आणली जात नाही. त्याला तुरुंगात अत्यंत चांगल्या पद्धतीने वागवले जात आहे. देशद्रोह्याला राजकीय कैद्याची वागणूक मिळत आहे. मुंबई हल्ल्याचा आरोपी कसाबच्या संरक्षणावर कोट्यावधी रुपयांची उधळण केली जात आहे आणि फक्त संशयावरून अटक केलेल्या एक साध्वी आणि उत्तम कारकीर्द असलेल्या एका सेनाधीकार्याची छळवणूक केली जात आहे.

सत्ताधारी पक्ष एकूणच पक्षपाताची भूमिका घेत आहे. यात काही विशिष्ट वर्गाच्या लोकांना लक्ष्य केले जात आहे. ATS ची भूमिका प्रचंडपणे संशयास्पद आहे. या घटनेची निष्पक्षपणे आणि राज्याबाहेरच्या वेगळ्या सुरक्षा यंत्रणेकडून चौकशी होणे हे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर चोर सोडून संन्यासाला फाशी हि म्हण या महाराष्ट्र राज्यात प्रत्यक्षात येईल आणि असा झाला तर त्यापेक्षा दुर्दैवी दिवस जगाच्या इतिहासात नसेल.


सुदर्शन

1 comment: